spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

इगतपुरी भरदिवसा खून

इगतपुरी : इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचार्‍याचा भरदिवसा खून झाल्याची घटना घडली असून भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावानेच खून केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातून एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. बुधवार दि. 7 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सख्खा चुलत भाऊ असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला.
या घटनेत इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी मदन बबन गोईकणे, वय 50 रा. गिरणारे ता. इगतपुरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याच्याबरोबर सकाळी मदन गोईकणे यांचा वाद झाला होता. या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा या परिसरात सुरु आहे. संशयित आरोपी महेंद्र गोईकणे याने धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याबाबतची फिर्याद मयताची पत्नी सिंधूबाई मदन गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी इगतपुरी पोलीसांनी या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब दडस यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

ताज्या बातम्या