spot_img
23.7 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

नायगाव येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम

नाशिक : नोकिया अर्थसहाय्यित स्मार्टपूर प्रोजेक्ट अंतर्गत ऋचा संस्था, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत नायगाव व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नायगाव येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन ऋचा संस्थेच्या टीममधील हरिष वैद्य (राज्य प्रमुख), सुकेश केंद्रे (स्मार्टपूर प्रकल्प समन्वयक), सागर ढगे (स्मार्टपूर प्रकल्प सुपरवायझर), वनिता बोरसे (कम्युनिटी फॅसिलिटेटर) तसेच उमेद अभियानचे विजय कुटे (तालुका व्यवस्थापक), विक्रम भास्कर (प्रभाग कृषी व्यवस्थापक) आणि अविनाश राठोड (उमेद अभियान) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावचे ग्रामविकास अधिकारी विलास रामदास सांगळे, प्रशिक्षक डॉ. संभाजी हरिभाऊ आव्हाड (सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी), अविनाश राठोड (उमेद अभियान), विक्रम भास्कर (प्रभाग कृषी व्यवस्थापक), वनिता बोरसे (कम्युनिटी फॅसिलिटेटर) तसेच गावच्या उठझ मंगल वानखेडे उपस्थित होत्या.
ग्रामसेवक विलास सांगळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी उपस्थित महिलांना तीन दिवसांच्या कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे महत्त्व व त्यातून स्वावलंबनाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात स्वयंसहाय्यता गटातील सुमारे ५० महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे महिलांना कुक्कुटपालन व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान मिळून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला निश्चितच चालना मिळणार आहे.

ताज्या बातम्या