spot_img
23.5 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

प्रसिद्ध अभिनेत्यासह वडिलांची जमावाने बेदम मारहाण करून केली हत्या

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसार थांबण्याचे नाव घेत नाही . पंतप्रधान हसीना यांनी राजीनाम देऊन देश सोडला . सध्या त्या ठिकाणी लष्कर सत्ता स्थापत आहे. त्यानुसार त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत आश्‍वासन दिले असून आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र तरी देखील तेथील हिंसाचार थांबायला तयार नाही . यामध्ये ाज प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. अभिनेता शांतो खानचे वडील सलीम खान हे चांदपूर सदर उपजिल्हाच्या लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते. ते चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकही होते. या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
रिपोर्टनुसार, शांतो खान आणि त्याचे वडील सलीम घरातून निघाले असताना फरक्काबाद मार्केटमध्ये हिंसाचार झाला. त्यानंतरच त्यांनी जमावाचा सामना केला. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांनी गोळीबार करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर हल्लेखोरांनी सलीम खान आणि शांतो खान यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली.

हिंदूंची १२ घरे, दोन मजली इमारती पेटवल्या


बांगला देशात हिंदू आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्याचे केंद्र बनत आहेत. हिंदूंच्या व्यापारी प्रतिष्ठानांवर आणि मंदिरांवर हल्ले चढवले जात आहेत. बांगला देशमध्ये २७ जिल्ह्यांमध्ये हिंदू घरांना लक्ष्य करण्यात आले. हिंदू धार्मिक कार्याशी संबंधित प्रदीप चंद्र रॉय यांच्या घराची तोडफोड करून लूटमार करण्यात आली आहे. हातिबंधा जिल्ह्यात १२ हिंदूंची घरे पेटवली. खानसामा जिल्ह्यात तीन हिंदूंच्या घरावर हल्ला करण्यात आला. पंचगढमध्ये अनेक हिंदू घरांवर हल्ले करण्यात आले. लक्ष्मीपूरमध्ये हिंदूंच्या दोन मजली इमारतीला आग लावण्यात आली आहे. याशिवाय बांगला देशमधील दिनाजपूर, शेरपूर, खुलना, फेनी, नरसिंगडी, लखीपूर, किशोरगंज, चट्टोग्राम, जशोर, सातखीरा, नरेल, हबीगंज, बोगुरा, पटुआखली, पंचगढ, मागुरा, मैमनसिंग, टांगैल, बागेरहाट, नौखाली या ठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे.

ताज्या बातम्या