spot_img
20.8 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद योजनेची नाशिकला जोरदार अंमलबजावणी करू-आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, नाशिक

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश 

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ते चळवळीच्या वतीने, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी भेट घेत, शेत रस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्ते, तसेच मुख्यमंत्री बळीराजा योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी निवासी ऊपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तसेच ऊपजिल्हाधिकारी ज्योती आहिरे यांच्याशिही या विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्याप्रमाणे या दोघाही अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
     यावेळी शिवपाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते तथा अध्यक्ष शरद पवळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खुडे, उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, शांताराम पानमंद, सुरेश भुजबळ, भिकाजी पवार, सोमनाथ कुंभार्डे, अशोक जाधव, गंगाधर वलवे, ज्ञानेश्वर काकड, नागेश भोसले, दिपक बुगे, काशिनाथ साबळे, नाना शिंदे, विजय दरेकर, बाळासाहेब थोरात यांसह, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेकडो पीडित शेतकरी उपस्थित होते..

ताज्या बातम्या