spot_img
19.3 C
New York
Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

माजलगावात तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

माजलगाव : शहरात 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लॉजवर नेवून बलात्कार केल्याचा ध क्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंधरा दिवसांपूर्वी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपी मोकाट आहेत. तसेच आरोपीकडून पीडितेच्या कुटुंबाला केस परत घ्या अन्यथा ठार मारू अशी धमकीही दिली आहे.
याप्रकरणी पीडितेच्या आईने थेट मुख्यमंत्र्याकडे न्यायाची मागणी केली आहे. माजलगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत 6 जून रोजी नववीत शिकणारी पीडित विद्यार्थिनी रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपीने तिला गाडीवर बसवून माजलगाव शहारातील अतिथी लॉजवर नेले व तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारीन अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडित मुलीने याबाबत कुणालाच काहीच सांगितले नाही.परंतु शाळा झाल्यावर शाळेत जायला नकार दिला, यावेळी आईने कारण विचारले तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने म्हटले की, ’4-5 मुलांनी मला गाडीवर बळजबरीने बसवून लॉजवर नेवून अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितल तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला शाळेत जायला भीती वाटत आहे. माझ्यावर एकाने अत्याचार केला पण लॉजवर साथ देणारे तिघेजण होते. सर्वजण एकाच रूम मध्ये होते. यानंतर आई मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली व 30 जून रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहे. तो पीडितेच्या कुटूंबाला मिटवून घ्या अन्यथा तुमच्या मुलीला उचलून नेवू अशा धमक्याही देत आहे. याबर बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी, हे प्रकरण सामुहिक बलात्काराचे आहे. त्यामुळे इतरांवरही गुन्हा दाखल करावा. आरोपीला अटक केली नाही तर पोलीस स्टेशनला घेराव घालण्याचा इशाराही पोटभरे यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चु यांनी सांगितले की, ’आरोपीला अटक करण्यासाठी आमच्या टीम पाठवल्या आहेत. कॉल डिटेल्स तपासली जात आहे. या लॉजवरही कारवाई केली जाईल.’ दरम्यान, या प्रकरणामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष घालून लाडक्या भाचीला न्याय देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या