spot_img
32.3 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

spot_img

गेवराईत मृतदेह आढळल्याने खळबळ

बीड : गेवराई येथे पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या गेवराई शहरालगत आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जमादारणीच्या पुलाजवळ सुनसान परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यामुळे हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात असून, परिसरात चर्चेला उधाण आले आहे. संभाजी हरिभाऊ गायकवाड राहणार गेवराई असे त्या मयताचे नाव आहे. या जमादारनीच्या पुलाजवळ हा परिसर निर्मनुष्य असतो. याच परिसरात काही वर्षापूर्वी सदर मयताच्या भावाचा मृतदेह देखील आढळून आला होता.आणि काही महिन्यापूर्वी देखील या भागात एक मृतदेह आढळून आला होता. मात्र त्याचाही तपास अद्याप लागला नाही. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गेवराई पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक लंके, ए एस आय सुरेश पारधी, संजय राठोड रवींद्र राऊत घटनास्थळी दाखल झाले. सदरील घटनेचा पंचनामा केला. आणि तो मृतदेह शव विच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे दाखल करण्यात आला. मात्र शवविच्छेदनानंतर हा घात की अपघात हे लक्षात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या