spot_img
23.2 C
New York
Monday, June 15, 2026

Buy now

spot_img

प्रसादराव साळवे यांच्या पुतळ्याचा आज अनावरण सोहळा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती
नागपूर : स्वातंत्र्य सैनिक तसेच एच.एच. श्री. निर्मला देवी यांचे वडील प्रसादराव केशवराव साळवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा रविवारी (ता.८) रोजी सकाळी ११ वाजता नागपूर सावनेर महामार्गावरील पाटणसावंगी लगतच्या बिडकवडस परिसरातील पी. के. साळवे ऍकॅडमी ऑफ फाईन आर्ट अँड म्युझिक येथे आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुनील केदार तसेच डॉ. विपिन इटनकर उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ आशिष देशमुख,
वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर कोहळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
साळवे परिवार प्राचीन शालिवाहन राजवंशचे प्रत्यक्ष वंशज मानले जातात. या परिवाराने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्रेरणादायी आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे.
स्वर्गीय प्रसाद साळवे महात्मा गांधी यांचे निकटवर्ती होते. भारतीय संविधान सभेचे ते सदस्य होते, भारतीय संविधान निर्माणच्या ऐतिहासिक कार्यात त्यांनी विशेष सक्रिय भूमिका बजावली होती, या पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन पी. के. साळवे ऍकॅडमीच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या