spot_img
16.8 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

युध्दाचा फटका : गॅसचा भडका

इस्त्राईल-इराण आणि अमेरिका या देशांनी युध्द तरी सुरू केले आहे. मात्र त्याचा फटका आता संपूर्ण जगाला बसू लागला आहे. कारण ज्या ठिकाणी हे युध्द सुरू आहे. त्याच ठिकाणाहून जगभरात २० टक्के तेलाची निर्यात होते. तसेच गॅस असेल आणि वाहतुकीचा मार्गही असेल.. सध्याची जर स्थिती पाहीली तर आपल्याला लक्षात येईल की, ज्या पद्धतीने युध्द थांबण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता दिसत नाही. कारण इराण यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी युध्द सुरू केले आहे. त्यांनीच हे युध्द थांबवावे. मात्र आम्ही आमच्या आत्मसन्मानासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार. ज्या पद्धतीने सध्याची परिस्थिती तेल असेल, गॅस असेल या विषयी झालेली आहे. त्याचा आता कुठे सर्वसामान्य लोकांना देखील त्याचा फटका बसायला सुरूवात झाली आहे. जर आपण भारताचा विचार केला.. तर सध्या भारताकडे तीन महिने पुरेल एवढा तेलाचा साठा आहे असे सांगितले जाते.. मात्र प्रत्यक्षात तुर्कीकडून तेल आयात केले जाणार असल्याचीही माहिती माध्यमातून समोर आलेली आहे . हा विषय झाला तेलाचा परंतु सर्वसामान्यांना लागणार्‍या गॅसच्या किंमती देखील शनिवार ७ मार्च २०२६ पासून ६० रूपयांनी वाढ करायचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री नक्की लावणार हे तर यातून स्पष्टपणे दिसत आहे.

गेल्या काही महिन्यापासून या गॅसच्या दरात स्थिरता होती.. मात्र प्रत्यक्षात होत असलेल्या युध्दामुळे जो काही गॅसचा पुरवठा करण्यात येत होता तो , ठप्प झालेला आहे. त्यामुळे जेंंव्हा आपल्याला दुसर्‍या मार्गाने आणि दुसर्‍या देशाकडून आयात करावी लागणार आहे.. त्याचा फायदा इतर देश त्याचे दर वाढवूनच आपल्याला देणार.. मग त्यांची भरपाई कोणाच्या खिशातून होणार.. तर ती आपल्यालाच भरपाई करावी लागणार.. मग आजच्या परिस्थितीत जर आपण वेगवेगळ्या शहरातील गॅसच्या दरा संदर्भात माहिती घेतली तर.. सध्या मु
घरगुती सिलिंडरचे नवे दर (१४.२ किलो): नवीन दरांनुसार, देशातील प्रमुख शहरांमधील किमती जर दिल्लीत ८५३ रुपयांना मिळणारे सिलेंडर आता आता ९१३ रुपये मिळणार आहे. त्याच प्रमाणे मुंबईत ८५२.५० रुपयांवरून आता ९१२.५० रुपये मिळेल. चेन्नई: ८६८.५० रुपयांवरून आता ९२८.५० रुपये पर्यंत हे सिलेंडर मिळेल. तर व्यावसायीक सिलेंडर देखील वाढविण्यात आला आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणार्‍या १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ झाली आहे.
देशातील सरकार असो की सर्वसामान्य लोकांना वाटत होते की.. युध्द तर अमेरिका , इराण, इस्त्रायल यांचे सुरू आहे. त्याचा फटका आपल्याला कसा बसणार.. तर त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसायला सुरूवात झाली आहे. आता वाढलेले हे दर स्थिर राहतील.. याची देखील शक्यता सांगता येत नाही. जोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होत नाही.. तो पर्यंत अजून कोणता फटका सर्वसामान्यांना बसू शकतो तेही आपल्याला येत्या काळात लक्षात येईल.

 

ताज्या बातम्या