spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सहजकृषी कार्यशाळा चैतन्यमय वातावरणात संपन्न

बीड : केज तालुक्यातील सारणी येथे दिनांक २९ जून २०२५ रोजी बीड जिल्हास्तरीय सहजकृषी कार्यशाळा केज तालुक्यातील सारणी गावात अत्यंत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेचा उद्देश शेतकर्‍यांमध्ये सहजयोग आधारित कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि शाश्वत शेतीसाठी प्रेरित करणे हा होता.
ही कार्यशाळा परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेने आणि सहजयोगाच्या चैतन्याच्या साक्षीने अतिशय प्रेरणादायी वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, या भागात दीर्घकाळ दुष्काळसदृश्य स्थिती होती. मात्र कार्यशाळेच्या दिवशी श्रीमाताजींच्या कृपेने पावसानेही हजेरी लावली, आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.


यावेळी मार्गदर्शक वक्ते म्हणून या कार्यशाळेत अनेक अनुभवी आणि मार्गदर्शक वक्त्यांचे उपस्थित लाभले, ज्यामध्ये प्रमुखतः: माजी महाराष्ट्र सहजकृषी प्रमुख मोहन जोशी काका सध्याचे महाराष्ट्र राज्य सहज कृषी प्रमुख पंजाबराव बिहाडे काका नामदेवराव रहाणे काका महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात व गोवा या राज्यांचे रिजनल प्रमुख नारायण निबे सर माजी रिजनल समन्वयक भवर साहेब आणि प्रा. ताकटे सर यांचा समावेश होता. या सर्व मान्यवर वक्त्यांनी सहजकृषीचे महत्त्व, त्याची वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पद्धत, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान प्रभावीपणे समोर मांडले.
यावेळी प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमास संभाजीनगर रिजनल समन्वयक प्रकाश दादा शिंदे, संभाजीनगर जिल्हा सहजकृषी प्रमुख, तसेच तेथील काही सामूहिक सहजयोगी मंडळींची विशेष उपस्थिती होती.
बीड जिल्ह्याच्या समन्वयक पवार ताई, सहजकृषी प्रमुख गोदावरी शेळके, तसेच केज तालुका व सारणी गावातील सहजयोगी बंधू-भगिनींनी कार्यशाळेसाठी घेतलेली तयारी, परिश्रम आणि समर्पण कौतुकास्पद ठरले.
चैतन्याचा अनुभव आणि पावसाची भेट:
या कार्यशाळेचा सर्वात उल्लेखनीय भाग म्हणजे परमपूज्य श्री माताजींच्या चैतन्यामुळे शेतकर्‍यांना आत्मिक समाधान मिळाले, आणि या दुष्काळी भागात पावसाच्या रूपात माताजींची कृपा अनुभवता आली.
या चैतन्यमय कार्यशाळेचा अनुभव सर्व सहजयोगी आणि शेतकर्‍यांसाठी एक अमूल्य प्रेरणा ठरला आहे.
श्रीमाताजींचे कोटी कोटी आभार!

ताज्या बातम्या