spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

पैसे मिळेना गेवराईत बँकेच्या गेटवर गळफास

गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेर्‍या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्‍वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.
मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे परत न मिळाल्याने बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात एका वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांवरील विश्‍वासार्हतेवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह उभं राहिलं आहे. सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव असून, त्यांचे छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख तर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत 5 लाख रुपये अडकले होते. मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीने पैशांची गरज होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या फेर्‍या मारूनही त्यांना आपली रक्कम मिळाली नाही. वारंवार विनवण्या करूनही बँक व्यवस्थापनाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते मानसिक तणावात होते. बुधवारी रात्री उशिरा जाधव हे आपल्या कुटुंबासह बँकेत गेले होते. काही वेळातच त्यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर खळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या