spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

केजमध्ये दरोडा;दागिन्यासाठी तोडला कान

बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात वयोवृद्ध महिलेचा कान तोडून सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यात वृद्ध महिलेचा कान फाटून गंभीर इजा झाली आहे. वयोवृद्ध दांपत्याच्या शेतातील शेडमध्ये घुसून चौघा चोरट्यांनी तब्बल ७३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेले आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी समाबाई तुकाराम लाड (वय ८०) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मागील दोन दिवसांपासून पतीसोबत लाडेवडगाव शिवारातील अडीच एकर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत होत्या. दरम्यान १७ जूनच्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास चार ते पाच जण आले होते. त्यांनी दरोडा टाकला आहे.
रात्री शेडबाहेर झोपलेल्या त्यांच्या पतीला काही अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत झोपेतून उठवले. यावेळी आवाज ऐकून समाबाई यांनी आतून आवाज दिला असता एकाने दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. समाबाईनी माझा मुलगा मिल्ट्रीत आहे, त्याला फोन लावते असे म्हणाल्या. मात्र त्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत तुमच्यासोबतच्या दोन लहान मुली कुठे आहेत? असे विचारले. त्यावर घाबरलेल्या समाबाई यांनी ते दोघेच तिथे राहत असल्याचे सांगितले.
चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, नाकातील ३ ग्रॅमची नथ आणि कानातील ४ ग्रॅमचे फुले, एक साधा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. दरम्यान एक कानातील फुल निघत नसल्याने जबरदस्ती तोडले. यात समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर चारही चोरटे लोखंडी गेटवरून उड्या मारत अंबाजोगाईच्या दिशेने पायी निघून गेले. सर्वांनी चेहर्‍यावर कपडे बांधलेले असल्याने ओळख पटली नाही. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या