spot_img
10.7 C
New York
Tuesday, May 20, 2025

Buy now

spot_img

उसणवारीचे पैसे बुडविण्यासाठी कासलेने घेतले धनंजय मुंडेंचे नाव

आता कासले विरूध्दच झाला गुन्हा दाखल
बीड : निलंबित झाल्यापासून पीएसआय रणजित कासले, दहा लाख रूपये माजी मंत्री धनंजय मुंंडेंनी पाठविले म्हणत होता . परंतु जेंव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेंव्हा उसणवारी घेतलेले पैसे, देणे झाले नाही त्यामुळे, या पैशाचा आरोप माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नावावर लावला. पण प्रत्यक्षात आज जेंव्हा ज्या संत बाळू मामा कन्स्ट्रक्शने नाव कासले घेत होता, त्याच मालक सुदर्शन काळे यांनी रणजित कासले विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मालक यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे.
सुदर्शन काळे यांनी सांगितले की, रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे कार्यरत होता, त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली. डिसेंबर २०२४ मध्ये रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारीने मागणी केली.
एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या क्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी मला दुसर्‍या एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा आग्रह केला होता मात्र मी तसे न करता वैयक्तिक त्यांच्याच बँक खात्यावर पैसे पाठवले. त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो, असे सांगितले होते. साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली. माझे पैसे मला गरजेच्या वेळी परत न दिल्यास मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले, किंवा त्यांनी गुजरात मधून मला काही रक्कम पाठवली. तसेच सायबर ठाण्यातील गिरी नामक कर्मचार्‍यांच्या हाताने दोन लाख रुपये, असे तीन वेळा मिळून साडे (इशशव)सात लाख रुपये परत दिले आहेत. तर उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारी सोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत.  या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन कासले वर काय कारवाई करतात याकडेही आता लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या