spot_img
19.6 C
New York
Wednesday, June 24, 2026

Buy now

spot_img

मंत्री पंकजा मुंडे आज बाबासाहेब आगेंच्या घरी जणार

माजलगाव येथील भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्विकारली आहे. आगे यांच्या हत्येने मन सुन्न झाले असून एक धडाडीचा कार्यकर्ता मी गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. तर भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही मंत्री पंकजा मुंडेंनी स्विकारली आहे.
अशातच, आज (१९ एप्रिल) मंत्री पंकजा मुंडे (झरपज्ञरक्षर र्चीपवश) या बाबासाहेब आगे (इरलरीरहशल Aसश) यांच्या कुटुंबियांची किट्टी आडगाव येथे भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे आज घाटशीळ पारगाव येथील कार्यक्रम झाल्यानंतर माजलगाव येथील भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुबियांची दुपारी ३ वाजताच्या सुमारास भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. याआधीच भाजपा कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची जवाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यात गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हा नारळी सप्ताह होतोय. त्यामुळे आज (१९ एप्रिल) पुन्हा मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच अध्यात्मिक व्यासपीठावर पाहायला मिळतील. शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा ९३वा नारळी सप्ताह पार पडला. आज या सप्ताहाची सांगता होत असून काल्याच्या कीर्तनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित असतील. साधारण साडेअकरा वाजता हे दोघेही हेलिकॉप्टरने घाटशीळ पारगाव येथे दाखल होतील. या निमित्य ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी इथे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या