spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

मुलीला पळविणारा पकडला

बीड  : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका एका सराईत गुन्हेगाराकडे दोन गावठी कट्यासह, एक काडतूस आढळून आले आहेत. कुमार दत्तू कांबळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गावठी कट्टा आणि काडतूस ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री केरूळ येथे करण्यात आली.अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी कुमार दत्तू कांबळे ( रा.वरकुटी.ता.इंदापूर. जि.पुणे) हा आष्टी तालुक्यातील केरूळ येथे आहे.
अंभोरा पोलिसांना सोमवारी रात्री गोपनीय माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी कुमार दत्तू कांबळे ( रा.वरकुटी.ता.इंदापूर. जि.पुणे) हा आष्टी तालुक्यातील केरूळ येथे आहे. माहितीवरून पोलिसांनी केरूळ येथे छापा टाकला. येथे कुमार एका घरात अपहत मुलीसोबत आढळून आला. पोलिसांनी कुमार कांबळेस ताब्यात घेऊन झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे दोन गावठी कट्यासह, एक राऊंड मिळून आले. पोलिसांनी कांबळे यास अटक करून शस्त्र जप्त केले. याप्रकरणी पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात 49/25 आर्म ऍक्ट कलम 3, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे,शरद पोकळे,आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार मजरूद्दीन सय्यद, दिपक भोजे यांनी केली.
सराईत गुन्हेगार कुमार दत्तू कांबळे याने दहा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला तिच्या गावातून पळवून आणले होते. त्यावरून कुमार दत्तू कांबळेवर इंदापूर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. कांबळेस अटक केल्यानंतर पीडित मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताज्या बातम्या