बीड : जिल्हाप्रमुख गणेश वरेकर , जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्कनेते सुनिलजी प्रभू , विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादा दानवे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुळकर साहेब ,संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव व महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी,सहसंपर्कप्रमुख बदामराव अंबा पंडित ,यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर व जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर यांच्या नेतृत्वाखाली व उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ महुवाले,तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन व महिला आघाडीच्या बीड विधानसभा संघटिका मीराताई नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन संपन्न झाले.
यावेळी बोलताना वरेकर व सातपुते म्हणाले की,एस.टी. हि गोरगरीबाची लालपरी असुन सर्वसामान्य लोकांना प्रवासाचे ते महत्त्वाचे साधन आहे, ग्रामीण भागातील लोकांना दळणवळणासाठी हि सेवा अत्यंत महत्त्वाची आहे परंतु महाराष्ट्राततील युतीच्या सरकारने निवडणुकीत नको त्या योजना काढल्या व मतदारांना आमिष दाखवून प्रचंड पैसा तिकडे वळवला मग आता सरकार चालवण्याची नामुष्की ओढवलयानंतर अनेक ठिकाणी भाववाढ करुन गोरगरीब लोकांच्या खिशाला कात्री लावली जात आहे अशाच पध्दतीने एस .टी. ची वारेमाप भाववाढ करण्यात आली आहे हि बाब पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या लक्षात आल्यावर संबंध महाराष्ट्रत आज चक्का जाम आंदोलन पुकारले आहे त्या अनुषंगाने आम्ही बीड बसस्थानकासमोर सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांना सोबत घेऊन हे आंदोलन केले आहे जर शासनाने भाववाढ रद्द केली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही जिल्हाप्रमुखांनी दिला यावेळी जिल्हा सचिव श्रीकृष्ण गायके ,उपतालुकाप्रमुख अशोक सगळे, उपतालुकाप्रमुख प्रकाश धुताडमल , उपतालुकाप्रमुख दादासाहेब सोनवणे , तालुका संघटक शेख कलिमभाई ,आसाराम वैध ,भरत खरात ,विनोद गुंड पाटील ,अजय गुंड , भिमराव कुटे , सर्कलप्रमुख रमेश नवले ,बाळु वरेकर , माजी सरपंच सखाराम मोहिते ,दिपक घोडके ,बाबु कुटे , सुनिल शेळके ,बाळू कुटे ,अशोक काळे ,प्रसाद कुठे , चंद्रकांत बजगुडे ,राजेभाऊ नवले , दादा ढोले , रत्नाकर येवले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.