spot_img
1.2 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांना शासननिर्णयात घेवू- महमुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सरकारचा परिपूर्ण शासणनिर्णय बनल्यावर प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार-पवळे,जंगले पाटील
ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
राज्यात शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसोबत शेतरस्त्यांचा प्रश्न ज्वलंत बनत चालला अजुन या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादा साहेब जंगले पाटील यांनी शेतरस्त्यांच्या प्रश्नाकडे सरकार प्रशासणाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर विविध ऐतिहासिक आंदोलनाच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देत जनजागृती करत सरकारसोबत पत्रव्यवहार करत संवाद साधण्याचे काम सुरू असताना महसुलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनीही विषयाला न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळे महराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी मुंबई मंत्रालय येथे मंत्री बावनकुळे साहेब यांना शासनिर्णयाच्या त्रुटी व मुद्दे या विषयावर निवेदन देत चर्चा केली.
मंत्री बावनकुळे साहेब यांनी संबंधीत अधिकार्‍यांकडे मागण्यांचे निवेदन देत यामधील मुद्दे शासन निर्णयात घेण्याच्या सुचना दिल्या सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही निवेदन दिले असताना त्यांनीही संबंधित विभागांना तातडीने लक्ष घालुन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले निवेदनात राज्यातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करून दर्जेदार शेतरस्ते करा, तहसिल कार्यालयांतील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा,ग्रामशेतरस्ता समित्या स्थापनेचे आदेश तातडीने देवून त्यांचा अहवाल घेवून कार्यवाही करावी,वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून नकाशावर घ्यावेत,शेतरस्त्यांना नंबरी लावुन त्यांचे सर्वेक्षण करावे व नंबरी हवणारांना दंडात्मक कारवाई करावी,मा.उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर दाखल याचिका क्रं.८२८७/२०२३ रोजीच्या निकालानुसार राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांना ६० दिवसांच्या आत शेतरस्ते खुले करण्याचे आदेश द्यावेत,नकाशावरील शासकीय शेतरस्त्यांना वादी म्हणून सरकारचा प्रतिनीधी असावा, वाटपत्रात शेतरसत्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपत्र करू नये, शेतरस्त्या अभावी पडीक राहणार्‍या जमिनधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्या शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी चळवळीच्या माध्यमातून राज्य मंत्र्याकडे केल्या आहेत.
समृद्ध महाराष्ट्रासाठी शेतकरी समृद्ध व्हावा या उद्देशाने प्रत्येक सरकारने शासन निर्णय बनवले परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास आपण कुठेतरी कमी पडलो त्यामुळेच शेतकर्‍यांचा पिढ्यानपिढ्या शेतरस्त्यांसाठी प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष सुरूच आहे त्यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य धोक्यात आल्यामुळे त्यांना न्याय मिळून देण्यासाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेवटच्या शेतकर्‍याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी लढा सुरू केला आहे- शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट् राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ)

ताज्या बातम्या