जळगाव : येथील परांडा रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात झाला आहे. येथे पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली होती. यानंतर अनेकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेली माहिती अशी, मुंबईकडे जाणार्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावला. यामुळे अचानक आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. यामुळे प्रवाशांनी आग लागल्याची भीती व्यक्त केली. यामुळे अनेक प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. पण समोरुन येणार्या बंगळुरु एक्सप्रेसने अनेकांना चिरडले. या घटनेत सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रवाशांनी दिलेली माहिती अशी, आम्ही पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करत होतो, पण रेल्वेला अचानक ब्रेक लावला यावेळी ठिणग्या मोठ्या प्रमाणात उडाल्या. यावेळी प्रवाशांना आग लागली असं वाटले, यामुळे प्रवाशांनी अचानक रेल्वेतून उड्या मारण्यास सुरुवात केली. तर दुसर्या ट्रकवरुन बंगळुरु एक्सप्रेस गाडी येत होती. या रेल्वेखाली अनेक प्रवाशी चिरडल्याची भीती आहे.