spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये क्लासच्या नावाखाली विजय पवार,प्रशांत खाटोकरने केले मुलीचे लैंगीक शोषण

बीड : गेल्या वर्षभरापासून कुठल्या ना कुठल्या गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर छेडछाड आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी आरोपी शिक्षकांची नावं असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या काळात सातत्याने घडला. पीडित अल्पवयीन मुलगी ही नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी बीडमधील उमाकिरण कोचिंग क्लासेस या खाजगी कोचिंग क्लासमध्ये जात असे. तिथे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी तिच्यासोबत छेडछाड करून तिचं लैंगिक शोषण केलं. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रशांत खाटोकर याने गतवर्षी जुलै महिन्यांपासून तिच्या लैंगिक छळास सुरुवात केली. प्रशांत खाटोकर हा पीडित मुलगी वर्गातून सुटल्यावर रस्त्यावर जाऊन थांबायचा. तसेच तिला आपल्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करायचा. एवढंच नाही तर कधी कधी क्लास संपल्यावर तो या मुलीला केबिनमध्ये बोलवायचा. तसेच कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करायचा. त्यानंतर तिच्या शरीराला स्पर्श करायचा, तसेच याबाबत घरी सांगितल्यास जिवे मारेन अशी धमकी द्यायचा, असा आरोप पीडितेने केला आहे. एवढंच नाही तर आरोपींनी आपले अश्लील फोटोही काढल्याचे पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पीडित मुलीने या प्रकाराबाबत दुसरा शिक्षक असलेल्या विजय पवार याला माहिती दिल्यानंतर त्यानेही तिची मदत न करता तिचं शोषण केलं. विजय पवार हा सुद्धा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. एकटीला बोलावून घ्यायचा, त्यामुळे इतर विद्यार्थीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या सर्व छळाला कंटाळून पीडित मुलगी ही मानसिक तणावाखाली गेली. मुलीच्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचंही राजकीय कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ताज्या बातम्या