spot_img
2 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

अहिल्यानगर (लोणी) येथे मेगा पब्लिक प्रोग्राम

अहिल्यानगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील लोणी येथे रविवार दि.२६ जानेवारी रोजी पब्लिक प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्री माताजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी याच गावामध्ये १९९० ते ९१ मध्ये स्वतः श्री माताजी यांनी दोन पब्लिक प्रोग्राम घेतले होते. त्यामुळे या पावन भूमीच्या प्रोग्रामसाठी जास्तीत जास्त सहजयोग साधकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने सहजयोग ध्यान साधनेचा आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम दिनांक २६ जानेवारी २०२५ वार रविवार वेळ सायंकाळी ०६:३० भव्य दिव्य असा चैतन्यमयी सोहळा लोणी बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे होणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत सध्या अग्रेसर असलेले हे शहर नावाला ग्रामपंचायत आहे परंतु एक मोठी वसाहत असे असलेले अहिल्यानगर (अहमदनगर) व या जिल्ह्यातील राहता तालुक्यातील *लोणी हे शहर याच ठिकाणी आपल्याला श्री आदिशक्ती श्री माताजी यांच्या परम कृपेने नवीन साधकांना कुंडलिनी शक्तिची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शुक्रवार दि.२४ सकाळी ८ पासून रविवारी २६ जानेवारी २०२५ पर्यंत प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. रविवार दि.२६ जानेवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय लोणी बुद्रुक या ठिकाणी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम होईल. सर्व साधकांच्या राहण्याची सोय सुरभी मंगल कार्यालय लोणी येथे केली असून दि.२५ जानेवारी शनिवारी संध्याकाळी वेळ ७ ते ९:३० या वेळेत भजन संध्या मध्ये मुखियाराम सर व श्री अरविंद जी पवार श्रीरामपूर श्री कुलकर्णी साहेब श्रीरामपूर या सर्वांचे गायन आयोजित केलेले आहे .
२६/१/२०२५* *रविवार* *सकाळी ११:०० सेमिनार प्रचार प्रसार वरती* * *ज्येष्ठ** *सहजयोगी श्री प्राध्यापक नितीन दादा पवार श्रीरामपूर श्री सोळसकर साहेब नवी मुंबई यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. रविवारी संध्याकाळी ४.३० वाजता मेगा रॅली प्रोग्राम होणार आहे.
लोणी येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे राहुरी / शिर्डी जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर ) आहे.
या परिसरात इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज बीएससी ऍग्री कॉलेज आयुर्वेद कॉलेज बीएससी नर्सिंग कॉलेज आर्ट कॉमर्स सायन्स असे नामांकित अनेक कॉलेज मोठमोठे शाळा मोठमोठे कॉलेज आयटीआय कॉलेज कमीत कमी पाच ते दहा हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा कारखाना वसाहत त्यामुळे आपण येथील प्रचार शाळा आणि कॉलेज यांचा बुधवार गुरुवार पासून करू शकतो .या ठिकाणी आपले स्वतःचे ध्यान केंद्र असल्यामुळे राहण्याची व्यवस्था आहे तरी आपल्या टीम मधील जे सहज योगी बंधू-भगिनी शाळेत कॉलेजमध्ये कार्य करू शकतात.
अधिक माहितीसाठी
९७६७८४६८६८
९७६५७००१००
९१३०००५९३७
९८८१६७२८४२
९९२२१४३३४३
९८८१०५८०१३
८३२९२७५४९०
९४२२९०५१९९
९२२६७१२२४१
९८२२७७८९१८
९६५७४५३३८४
९०२८१३५१२१
९९२१७०७१९६
९७६७२८२००८
८३२९४४७३९१
९७६२६४६०४३
९२२६७१२२४१
९८५०१९७८५८
या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तरी ा परमेश्वरी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन *सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र यांनी केले आहे.

ताज्या बातम्या