रेल्वे पाहण्यासाठी बीडकरांची गर्दी
बीड – आज अहेमदनगर ते बीड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेची मालगाडी आली आहे. शहरातील नागरिकांचे बीड शहरात रेल्वे स्थानक आणि रेल्वे पाहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून येत्या २५ जानेवारी रोजी बीड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे आता यापुढे बीडला रेल्वे येणार, रेल्वे येणार असे म्हणून वाट पाहण्याची गरज राहणार नसून २५ जानेवारी पासून बीडला रेल्वे आली रे आली असे आनंदाने म्हणावे लागणार आहे. २५ जानेवारी रोजी बीड रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर बीड जिल्हावासियांना वेध लागणार आहे ते बीड ते परळी या रेल्वे मार्गाचे. एकदा हा रेल्वे मार्ग परळी पर्यंत पूर्ण झाला की, मग परळी-बीड-अहेमदनगर पर्यंत नियमितपणे रेल्वे सेवा सुरू होईल
आणि पर्यायाने यामुळे औद्योगिक क्षेत्रासह दैनंदिन व्यवसायातही बीडकरांच्या जीवनाला नवी चालना मिळणार आहे.