बीड : 2 वर्षामध्ये उत्तम कामगिरी केली असून त्यांच्या २०२३ या वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये बीड जिल्हा दलाने उत्तम कामगिरी केली केेली. तशा प्रकारचे परिपत्रकच पोलीस दलाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले असून त्यांनी केलेल्या कारवाई संदर्भातील आढावा त्यामध्ये स्पष्टपणे मांडला आहे.
पोलीस दलाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, नुकतेच २०२४ हे वर्ष संपले असुन २०२५ या नुतन वर्षास सुरुवात झाली आहे. २०२३ या वर्षाच्या तुलनेत २०२४ या वर्षात बीड पोलीस दल कारवायांच्या बाबतीत सरस ठरले आहे. त्याचप्रमाणे २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षांच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यामध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे.
गंभीर गुन्ह्यांचा आलेख बघता २०२३ या वर्षात बीड जिल्ह्यात खुनाचे एकुण ६४ गुन्हे दाखल असुन त्यापैकी ६० गुन्हे उघड आहेत तर २०२४ या वर्षात ४० खुनाचे गुन्हे दाखल असुन सर्व गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात मोठी घट झाल्याचे दिसुन येत आहे. तसेच २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न या सदराखाली बीड जिल्ह्यात एकुण १६५ गुन्हे दाखल असुन त्यापैकी १६४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत तर २०२४ या वर्षात खुनाचा प्रयत्न या सदराखाली एकुण १९१ गुन्हे दाखल आहेत तर त्यापैकी १९० गुन्हे उघड आहेत. तसेच दरोडा या सदराखाली बीड जिल्ह्यात २०२३ या वर्षात १४ गुन्हे दाखल असुन १४ गुन्हे उघड आहेत तर २०२४ या वर्षात २२ गुन्हे दाखल असुन त्यापैकी १९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. बलात्कार संभोग या सदराखाली बीड जिल्ह्यात सन २०२३ या वर्षात १६४ गुन्हे दाखल असुन त्यापैकी १६३ गुन्हे उघड आहेत. तर २०२४ या वर्षात १७६ गुन्हे दाखल असुन त्यापैकी १७३ गुन्हे उघड आहेत. यावरुन गुन्हे नियंत्रण व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांच्या सांघीक प्रयत्नांना यश आल्याचे दिसुन येत आहे.
तर अवैध धंद्यांवरील कारवायांमध्ये सुद्धा बीड पोलीस सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये वरचढ ठरल्याचे दिसत आहे. सन २०२३ मध्ये बीड जिल्ह्या पोलीसांनी १९३१ ठिकाणी छापे टाकुन अवैध दारुविक्री संबंधाने कारवाया केल्या असुन ७८,८७,४०३/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर २०२४ मध्ये १८५७ अवैध दारु विक्रीच्या ठिकाणी छापे टाकुन २,५६,६६,२६९/- रुपयांच मुद्देमाल जप्त केला आहे. सन २०२३ मध्ये बीड पोलीसांनी १७ ठिकाणी छापे टाकुन ७२,३२,९१७/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन त्या तुलनेत सन २०२४ मध्ये १६ ठिकाणी छापे टाकुन १,२८,५९,५५१/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये मिळालेल्या मुद्देमालाची संख्या जास्त असल्याचे दिसुन येत आहे.
त्याच प्रमाणे बीड जिल्ह्यात पोलीसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाया केल्याचे दिसुन येत आहे. सन २०२३ या वर्षात सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे १०११९ इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली असुन सन २०२४ मध्ये १०९५७ इसमांवर प्रतिबंधक कारवाया केल्याचे दिसुन येत आहे. सन २०२३ या वर्षात सीआरपीसी कलम ११० प्रमाणे ५१२ इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली असुन सन २०२४ मध्ये ८१८ इसमांवर प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत. सन २०२३ या वर्षात रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने अस्तीत्व लपवुन ठेवणार्या एकुण १९ इसमांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कमल १२२ प्रमाणे गुन्हे दाखल करुन प्रतिबंध करण्यात आला असुन सन २०२४ मध्ये २४ इसमांवर म.पो.अ. कलम १२२ प्रमाणे गुन्हे दाखल करुन प्रतिबंध करण्यात आला आहे. सन २०२३ या वर्षात ३२ सराईत अवैध दारु विक्रेते यांचेवर महराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असुन सन २०२४ मध्ये ४७५ सराईत अवैध दारु विक्रेत्यांवर कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक शांतता भंग करण्यार्या टोळ्या तसेच सराईत गुन्हेगार यांना हद्दपार करण्याच्या कारवाया सुद्धा बीड पोलीसांनी मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसुन येत आहे. सन २०२३ या वर्षात ०९ सराईत गुन्हे करणार्या टोळ्या बीड जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आल्या आहेत. तर २०२४ मध्ये एकुण ५ टोळ्या बीड जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आल्या आहेत. तसेच सन २०२३ मध्ये बीड जिल्ह्यातुन ३३ सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवीण्यात आले असुन सन २०२४ या वर्षात ५७ सराईत गुन्हेगार हद्दपार करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहे. त्याचप्रमाणे सन २०२३ या वर्षात १९ सराईत गुन्हेगारांना चझऊA कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले असुन सन २०२४ या वर्षात सुद्धा १९ सराईत गुन्हेगारांना चझऊA कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
एकंदरीत बीड जिल्हा पोलीस दलाने केलेली कारवाई ही सांघीक असुन बीड पोलीसांनी गुन्हे नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी केलेल्या प्रामाणीक प्रयत्नांचे फलीत आहे. यापुढेही बीड पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी अंमलदार यांनी निर्भीड, निष्पक्ष काम करुन यापेक्षा अधिक चांगले काम करुन बीड जिल्हा पोलीस दलाचा नाव लौकीक करावा. तसेच चांगले काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नवनित कॉंवत यांनी केले आहे.