spot_img
22.7 C
New York
Thursday, June 25, 2026

Buy now

spot_img

तीन आरोपी ;१४ दिवसांची पोलिस कोठडी

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणेला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काल कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या . तर मुख्य सुत्रधार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. शनिवार (दि.४) रोजी केज येथील न्यालयासमोर हजर केले असता. तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या हत्या प्रकरणातील फरार आरोपीपैकी प्रमुख सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरविणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली आहे. तर तर पुरवणी जबाब आवरून विष्णू चाटे यांना देखील अटक करण्यात आलेली होती. सध्या या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील तीन आरोपींना शनिवार (दि.४) रोजी केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. या तिन्ही आरोपींना कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सोनवणे यांना (दि.१८) तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

ताज्या बातम्या