सात जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
अंबाजोगाई – न्यायलयात सुरू असलेली केस मिटवण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये खंडणी दे अन्यथा जीव मारून टाकू अशी धमकी दिल्या प्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील मोहमद्दीया वसाहतीत राहणारे शिक्षक मुजोबोद्दीन हमीदोद्दीन काझी (वय ५७) यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नीने केस केली असून ही केस न्यायालयात सुरू आहे. ही केस मिटवायची असेल तर दहा ते पंधरा लाख रुपयांची खंडणी दे अन्यथा जिवे मारून टाकू अशी धमकी आरोपींनी त्यांना बडा हनुमान मंदिराच्या जवळ असलेल्या तलावा च्या परिसरात दिली. या प्रकरणी शिक्षक मुजोबोद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून मुक्तार सत्तार पटेल, अनवर मिस्कीन, सलाम मुक्तार पटेल, मुखीद मुक्तार पटेल, सय्यद असलम, सय्यद अक्रम, इम्रान खान (सर्व रा. परळी) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधीक तपास पोलिस उपनिरीक्षक कांदे करीत आहेत.