spot_img
8.8 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

मी घरी बसणार्‍यांपैकी नाही-शरद पवार

कालच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आज मी कराडमध्ये आहे. मी घरात बसणार्यांपैकी नाही. पुन्हा जोमाने लढणार्यांपैकी आहे, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या निकालाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
या वेळी शरद पवार म्हणाले की, सत्ताधार्‍यांच्या प्रचाराचा फटका आम्हाला बसला, सत्तेत बदल झाल्यास लाडकी बहीण योजना बंद पडणार, असा प्रचार सत्तधार्‍यांकडून केला गेला. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेगे तो कंटेगे‘ या नार्‍यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. अधिकृत माहितीशिवाय मी इव्हीएम विषयी बोलणार नाही, लोकांनी दिलेल्या निर्णयाचा मी अभ्यास करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी महापालिका निवडणूकात महाविकास आघाडी एकत्र निवडणूकी लढेल का या प्रश्नावर उत्तर देताना याबाबत अजून चर्चा झालेली नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती मतदारसंघातील निवडणकीबाबत बोलताना ते म्हणाले, युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवणे चुकीचे नव्हते; पण अजित पवार युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही. आमच्यातून गेलेल्यांना निवडणूकीत यश मिळाले ही मान्य करावे लागले. राज्यात विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसे संख्याबळ नाही; पण महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता असणे गरजेचे आहे. राज्यात मविआला चांगले यश मिळत होते पण आम्हाला अपेक्षित असलेला निकाल लागला नाही हे त्यांनी कबूल केले. आता महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याची आता लोक वाट पाहत आहेत. याचीही सत्ताधार्‍यांना आठवण करुन दिली.अजित पवार व एकनाथ शिंदे यांचेही राजकारण उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते या संदर्भात प्रश्न विचारला असता याबाबत चव्हाण यांनाच अधिक माहिती असेल असा खोचक टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या