spot_img
17.4 C
New York
Saturday, May 17, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये पांगरी रोडवर तरूणाचा मृतदेह

बीड : शहरातील पांगरी रोडवर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका तरूणाला बेदम मारहाण करून सौभाग्य लॉन्स जवळील दुकानाजवळ टाकून दिल्याची प्राथमिक स्वरूपात दिसत होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता सदरील तरूण मयत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सदरील मृतदेहाची जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता, सदरील तरूणाला अज्ञात वाहनाने उडल्याचे समोर आले असून सदरील त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालू आहेत.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2097152;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 30;

रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील पांगरी रोड परिसरात असलेल्या सौभाग्य मंगल कार्यालय जवळ एका ३५ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला. दुकानाच्या समोर पडलेला मृतदेह पाहून रस्त्याने जाणार्‍या लोकांनी त्याला पाहिले असता, शिवाजीनगर पोलिसांना या प्रकरणी संपर्क करण्यात आला. शिवाजीनगर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या हाताला, डोक्याला, कमरेल जबर मार लागलेला होता. त्याच बरोबर त्याच्या नाका, तोंडातून रक्त येत असल्याचे दिसत होते. या प्रकरणी सदरील तरूण कोण याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नसून या प्रकरणी कोणाला जर माहिती असेल तर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या