spot_img
28.1 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

आ.सुरेश धस म्हणतात पंकजा मुंडे यांनी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला

आष्टी : राजकारण करताना हलक्या कानाने केले नाही पाहिजे. तुम्ही तसेच तुमची बहीण आणि तुमच्या सोबत असलेले सर्वच लोक ओबीसी उमेदवाराची शिट्टी वाजावी म्हणून धोंडे साहेबाचा छुपा प्रचार केला, असा गंभीर आरोप आ.सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर विजयी सभेत केला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
आष्टी मतदारसंघात भाजपाचे सुरेश धस यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आ.धस म्हणाले, पंकजा मुंडे यांनी या निवडणूकीत तुम्ही माझ्या सोबत राहणे आवश्यक होते मात्र तुम्ही मला एकटे पाडले. तुमच्या दुटप्पी भूमिकेमुळे मतदार राजामध्ये संभ्रम निर्माण झाला. शेवटी मतदार राजा हा हुशार आणि चतुर आहे. त्यांनी मलाच हेरल. मी आयुष्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा मी चेला आहे. त्यामुळे आयुष्यात कधीच मला राजकारण करण्यासाठी जात पात शिवणार नाही.
मी लोकसभेच्या वेळेस एकतर्फी माझ्या मराठा समाजाचा तुमचा प्रचार करून अंगावर रोष घेतला मात्र तुम्ही या विधानसभा निवडणुकीत छुपा डाव खेळलात हे चांगलं केलं नाही. त्यामुळे तुम्ही हलक्या कानाने राजकारण करता असं मला वाटलं. असा थेट आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आष्टी येथील जाहीर विजयी सभेत केला. पंकजा मुंडे यांनी असं करायला नको होतं, असं देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या