spot_img
20.1 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

बीडमध्ये अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मृत्यू

बीड : बीड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून येतो आहे. मात्र, या मतदान सुरू असतानाचा मतदानकेंद्रावर उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत होते. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणार्‍या मतदान केंद्रावर ते थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले.शिंदे यांना शहरातील काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ताज्या बातम्या