spot_img
34.6 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

मानुरमध्ये मतदानासाठी निघालेली गाडी पलटी

शिरूरकासार : तालुक्यातील मानूर शिवारात कदम वस्तिजवळ बुधवार (दि.२०) रोजी बीड-पाथर्डी रोडवरील पुलावरून जवळपास दहा फुट खोल ओढ्यात कोसळली. या घटनेत चालक बालंबाल बचावला असून टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याचे कळते.
सदर घटनेबाबत माहिती अशी की, कळंबहून स्कॉर्पियो एम.एच.१६.५७३० या गाडीत अनिल वांढेकर हे जोहारवाडी तालुका पाथर्डी येथे मतदानासाठी जात असतांना मानूरजवळ असलेल्या कदम वस्तिजवळील दुपारी दिडच्या सुमारास पुलावरून सिमेंटच्या कठड्याला तोडून गाडी खाली पलटी झाली, या गाडीत फक्त वांढेकर एकटेच होते, पलटी झालेल्या गाडीतून ते बाहेर आले.

ताज्या बातम्या