spot_img
26 C
New York
Thursday, June 12, 2025

Buy now

spot_img

’लाडकी बहीण योजनेला’ स्थगिती, निधीही थांबवला

मुंबई  : राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहचली आहे. राज्यातील कानाकोपर्‍यापर्यंत या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळाला आहे. दरम्यान आता याच महत्वाच्या योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 20 लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणार्‍या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.राज्यातील महिला मतदारांना आर्थिक लाभ देऊन थेट प्रभाव टाकणार्‍या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या. एवढेच नाही तर आर्थिक लाभ देणार्‍या योजनांचा आढावाही घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे विभागाकडू या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या