वडवणी : तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातअ ाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सावंत सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री आवारे यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या विचाराने देश कसा प्रभावीत होता आणि त्यांनी देशाच्या उन्नतीसाठी किती कष्ट घेतले. याबाबत मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.