सध्या सणासुदीच्या काळ सुरु झाला आहे. या काळात देशातील शेतकर्यांना मोठी भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळं ५ ऑक्टोबरला शेतकर्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा होणार आहेत. जाणून घेऊयात याबबतची सविस्तर माहिती.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या योजनेपैकी एक आहे. पीएम किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत ९.२५ कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात ३.२५ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता ९.५ कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. मोदी सरकार सलग तिसर्यांदा सत्तेवर आल्यानंतर १८ जून २०२४ रोजी १७ वा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता ५ ऑक्टोबर २०२४ ला १८ वा हप्ता देण्यात येणार आहे.
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत ९.५ कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात २००० रुपये वर्ग केले जाणार आहेत. त्याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.