ज्ञानेश्वर काकड । सिन्नर
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील बसस्थानकासमोर एक डिझेल घेऊन जाणारा टँकर मंगळवार दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पलटी झाला. टँकर पलटी होताच या ठिकाणी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथे, नाशिककडे जाणारा (एम.एच.41-एयु-7236) या क्रमांकाचा टँकर, चालकाचा ताबा सुटल्याने अचानक बसस्थानकाच्या समोर पलटी झाला. टँकरमध्ये डिझेल भरलेले होते. त्यामुळे सर्व डिझेल रस्त्यावर सांडले.स्थानिक नागरीकांना ही बातमी कळताच, नागरिकांनी डिझेल घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याचे समोर आले आहे.