spot_img
9.1 C
New York
Sunday, November 16, 2025

Buy now

spot_img

डॉ.अशोक थोरात पुन्हा जिल्हा रूग्णालयाचे चिकित्सक

बीड– येथील जिल्हा रुग्णालयात आदर्श कारभाराचा वस्तूपाठ घालून देणारे डॉ. अशोक थोरात यांची पुन्हा एकदा बीडच्या जिल्हा शल्य चिकिस्तकपदावर वर्णी लागली आहे. डॉ.अशोक बडे यांच्या जागी त्यांना नियुक्ती देण्यात आली. कोरोना काळात डॉ. अशोक थोरात यांच्या तत्परतेमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले होते. यानंतर त्यांनी नाशिकमध्ये सीएस म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची सहाय्य्क संचालक म्हणून बदली झाली होती. आता पुन्हा तेथून ते बीडला सीएस म्हणून येतं आहेत. डॉ. अशोक बडे यांच्याकडे आता वैद्यकीय अधिकारी परभणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. अशोक थोरात पुन्हा बीडला आल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.

ताज्या बातम्या