spot_img
24.5 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

spot_img

बीड माजी जि.प.अध्यक्षाच्या भावाला एस.टी.बसने उडविले

केज : केज-कळंब रोडवरील माऊली सिनेमागृह आणि वंश पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. हा भीषण अपघात आज (दि. १) दुपारी ३. १५ च्या सुमारास घडला. किशोर पुरुषोत्तम शेटे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. ते केज येथील हिरो मोटार सायकल शो-रूमचे मालक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवेंद्र शेटे यांचे ज्येष्ठ बंधू होत.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर शेटे आज दुपारी केज-कळंब रोडवरून शेताकडे जात होते. यावेळी माऊली सिनेमागृह आणि वंश पेट्रोल पंपासमोर दुसरा एक दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत होता. त्याच्या दुचाकीचा किशोर शेटे यांच्या दुचाकीला धक्का लागल्याने ते रोडवर पडले. त्याचवेळी कळंबकडून केजच्या दिशेने कोल्हापूर-माजलगाव एसटी बस (एम एच २०/बी एल १४५२) भरधाव जात होती. त्या बस चालकाच्या बाजूच्या टायरखाली चिरडून किशोर यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती केज पोलिसांना कळताच त्यांनी रुग्णवाहिका आणि पोलीस घटनास्थळी पाठवली. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. एवढा भयानक अपघात घडलेला असताना देखील एसटी बस चालकाला अपघाताची कल्पनाच नव्हती. त्याने नियमितपणे गाडी केज बस स्टँड मध्ये गाडी आणून उभी केली. त्याची रजिस्टरला नोंद पण केली आहे.

ताज्या बातम्या