spot_img
22.8 C
New York
Tuesday, June 23, 2026

Buy now

spot_img

मुलीची छेड काढणार्‍या निफाडमध्ये बदडले

नाशिक : जिल्ह्यातील निफाड शहरातील शाळेच्या गेटवर विद्यार्थिनींची छेड काढणार्या दोन रोडरोमिओंना मुलींच्या नातेवाइकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. गौरव भिका मोरे व खुशाल सुनील पवार (दोघे रा. बेघर वस्ती उगाव रोड, निफाड) अशी संशयितांची नावे आहेत.
तालुक्यातील रसलपूर येथील आदिवासी कुटुंबातील मुली या निफाड येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून संशयितांकडून दुचाकीवरून या विद्यार्थिनींचा पाठलाग सुरू होता. तसेच अश्लील इशारे केले जात होते. त्यामुळे या विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. याबाबत त्यांनी आई-वडिलांकडे तक्रार केली. त्यानंतर विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी संशयितांना पकडून चोप देत दोन्ही संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पटारे तपास करीत आहेत.
शाळेसमोर, गेटवर, रस्त्यावरून पायी जाणार्या विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्रास दिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. शाळा, महाविद्यालय परिसरात धूमस्टाइल दुचाकी चालवणे, परिसरात दहशत निर्माण करणे, अश्लील वर्तन करणे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. असे प्रकार आढळल्यास पोलिसांना कळवावे. कडक कारवाई करण्यात येईल असे निफाडचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी सांगितले.

ताज्या बातम्या