spot_img
32.3 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

spot_img

अशोक मा.उच्च.मा.विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा

वडवणी : तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवार दि.१७ रोजी मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संस्थापक श्री.सर्जेराव काळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून दिनकरराव धांडे सर उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेतील अनुराग दिनकर धांडे याचा एमबीबीएसला प्रवेश, चक्रधर भगवान माने याची एसआरपीएफमध्ये निवड आणि राहुल लक्ष्मण मुंडे याला वैद्यकीय प्रवेश मिळाल्याबद्दल या सर्वांचा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आले.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचा गीत व भाषणाचा कार्यक्रमात वैष्णवी निर्मळ हीने मराठवाडा गीत गायन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सावंत सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.आवारे सर तर आभार पी.एस.कोळपे यांनी मानले. याप्रसंगी गावातील पालक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या