spot_img
15.2 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

पुणे : मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी सिनेसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे.अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (तळक्षरू घरवरा झरीीशव Aुरू) यांचे आज पहाटे मुंबईत निधन झालं आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (तळक्षरू घरवरा झरीीशव Aुरू) यांचे आज पहाटे निधन झाले. विजय कदम १९८० आणि ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या.विजय कदम यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीने एक मोठी हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सिनेसृष्टीच्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. आज अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या