spot_img
10.3 C
New York
Thursday, March 26, 2026

Buy now

spot_img

ब्राह्मणवाडे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे  सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नाशिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मणवाडे (ता. सिन्नर) या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे दिनांक 23/01/2023 ते 29/01/2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमामध्ये स्वच्छता मोहीम, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, पाणी अडवा–पाणी जिरवा या विषयावर जनजागृती, शाळा रंग काम, आरोग्यविषयक मार्गदर्शन, योगासन व प्राणायाम, तसेच व्यसनमुक्ती व स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. यासोबतच ग्रामस्थांशी संवाद साधून सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करण्यात आले.
शिबिरादरम्यान सकाळी प्रभातफेरी, योगासने व कवायत यांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. महिलावर्ग, युवक व ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमांना लाभला. गावातील ग्रामपंचायत सरपंच विलास गिते, उपसरपंच सुमन सुकदेव गिते, पोलिस पाटील इंजिनिअर कमलाकर रामराजे, रामदास भाऊ सानप, हरिभाऊ गिते, भाऊसाहेब रामराजे, दिलीप गिते, भिका माळी सर, संदीप गिते सर, वाघोजी गामणे ह्या मान्यवरांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ . सारंग पांडे डॉ गणेश शिंदे डॉ राणा महाजन NSS कार्यक्रम अधिकारी, डॉ . विठ्ठल विखे, डॉ प्रेरणा खैरनार प्राध्यापक  सतीश चोळके व इतर प्राध्यापक वर्ग  तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, स्वयंशिस्त व नेतृत्वगुणांचा विकास झाला, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
शिबिराच्या समारोपप्रसंगी ग्रामस्थांनी महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे आभार मानत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ब्राह्मणवाडे गावाने दिलेले सहकार्य व प्रेम विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

ताज्या बातम्या