spot_img
26.4 C
New York
Monday, May 18, 2026

Buy now

spot_img

अशोक उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी परीक्षेची तयारी पूर्ण

वडवणी :  तालुक्यातीलअशोक उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचाळा येथे इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी   दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी आवश्यक त्या सर्व बैठक व्यवस्थेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी  केंद्र संचालक सावंत बी.आर. यांच्या नेतृत्वात शाळा प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रावर १५ हॉलमध्ये रोल नंबर प्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था , स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आसन मांडणी तसेच शांत व शिस्तबद्ध वातावरण राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षक व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून संबंधित नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे तसेच आवश्यक साहित्य सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने पालक व शिक्षक वर्गाकडूनही शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या