spot_img
5.7 C
New York
Sunday, April 26, 2026

Buy now

spot_img

माजलगावात भरदिवसा  खून

माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथील भाजपाचे विस्तारक बाबासाहेब आगे याच्यावर कोयत्याने वार करून भर दिवसा खून करण्यात आला. सदरील खून करणारा आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आरोपी विरूध्द पोलीस प्रशासन कारवाई करत असल्याचे दुपारपर्यंत दिसून आले.
माजलगाव तालुक्यातील भाजपाचे विस्तारक बाबासाहेब आगे (वय 35 रा.किट्टीआडगाव) यांना भाजपा कार्यालयासमोरच आरोपी नारायण शंकर फपाळ रा.बेलुरा ता.माजलगाव याने कोयत्याने वार करत भर दिवसा जाग्यावरच जिवे मारले व सदरील आरोपींनी पोलीस स्टेशन गाठून हा गंभीर प्रकार केल्याचे सांगितले आहे. सदरील मयत बाबासाहेब आगे याचा ज्या ठिकाणी खून करण्यात आला. त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करून सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव शासकीय रूग्णालयात पाठविला आहे. सदरील आरोपीविरूध्द पोलीस प्रशासन कोणता गुन्हा दाखल करते याकडे लक्ष लागले असून पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत या गंभीर प्रकारावरून पोलिसांना काय सुचना देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या