spot_img
21.2 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

मुलीची आई वडिलांनी केली निर्घृण हत्या…

छत्रपती संभाजीनगर  : चार मुलं होते म्हणून जालना येथून ६ महिन्या पूर्वी दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीची दत्तक घेतलेल्या आई व वडिलांनी बेदम मारहाण करून हात पाय मोडून अंगावर चटके देऊन निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ३ वाजता सिल्लोड शहरातील मुगलपुरा भागात घडली. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी दोघा निर्दयी आई वाडीलास अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
हत्या झालेल्या ४ वर्षाय चिमुकल्या मुलीचे नाव आयात फईम शेख वय ४ वर्ष रा.अजिंठा हल्ली मुक्काम मुगलपुरा सिल्लोड असे आहे.तर तिची निर्घृण हत्या करणार्‍या निर्दयी आईचेनाव फौजिया शेख फईम वय २७ वर्ष व वडिलांचे नाव शेख फईम शेख आयुब वय ३५ वर्ष दोघे रा.अजिंठा हल्ली मुक्काम मुगलपुरा सिल्लोड असे आहे.
या दोघांनी मिळून मुलींचा गेल्या १५ दिवस अमानुष छळ केला तिला उपाशी ठेवले तिच्या अंगावर काही तरी जळत्या लाकडाने तिला पूर्ण अंगावर चटके दिले.तिचे तळ हात व तळ पाय पिरगळुन जॉईंट मधून हात पाय तोडले त्या नंतर तिच्या डोक्यात व पाठीत कशाने तरी जोराने मारून तिला गंभीर जखमी केले विव्हळत असलेली चिमुकली मुलींची अखेर २६ मार्च रोजी रात्री ३ वाजता प्राण ज्योत मावळली.
तिची निर्घृण हत्या केल्या नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने वरील दोघा आई वडिलांनी परस्पर रात्री ३ वाजता तिचा सिल्लोड येथील एका कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्याचा प्रयत्न केला मात्र आजू बाजू असलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी सिल्लोड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली सहायक पोलिस अधीक्षक मयंक माधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे ,फौजदार बी. एस.मुंढे,डी. आर. कायंदे यांनी घटनास्थळी जाऊन तिचा दफनविधी रोखला व तिला शवविच्छेदन साठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वार्‍या सारखी सिल्लोड शहरात पसरली लोकांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यात गर्दी केली होती काही काळ तणाव निर्माण झाला होता.त्या नंतर पोलिसांनी हत्या करणार्‍या दोघा आईवडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.शोकाकुल वातावरणात सिल्लोड येथील कब्रस्तान मध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पोलीस, गावातील प्रतिष्ठित नागरिक मूळ आई व हत्या करणार्‍या आई वडिलांच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली आहे.दोन्ही आरोपी हे मूळचे अजिंठा येथील रहिवासी असून ते १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते.व सिल्लोड येथे आल्या पासून त्यांनी मुलीचा छळ सुरू केला होता.नेमके त्यांनी मुलीला कशामुळे इतक्या निर्दयी पणे मारहाण करून चटके देऊन खून केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र सिल्लोड पोलीस याचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या