केज : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रवाशी निवार्यामध्ये एक बेवारस मृतदेह (दि.26) शनिवारी सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी एका अंध व्यक्तीचा मृतदेह केज बसस्थानक समोर आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच आज (दि.26) शनिवारी सकाळी तहसील कार्यालयसमोर असलेल्या प्रवाशी निवार्यात एका (60) वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका पाचारण करुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून. या व्यक्तीचा मृत्यु नेमका कश्याने झाला हे शवविच्छेदन झाल्यानंतर समोर येईल.