spot_img
24.2 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img

विधानसभा निवडणुक पार्श्‍वभूमीवर लिंबागणेश येथे पोलिसांचे पथसंचलन

बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या असुन पुढील काळात राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन आणि प्रचाराला वेग येणार आहे या पार्श्‍वभूमीवर राजकीय नेते मंडळींकडून आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडणार आहेत.या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा हा सोहळा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे या उद्देशाने पोलिसांचे पथसंचलन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे.
या अनुषंगाने आज दि.26 शनिवार रोजी दुपारी लिंबागणेश येथे नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे , पोहे. रावसाहेब ढाकणे, सानप,बांगर,लिंबागणेश पोलिस चौकीचे अंमलदार संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंढे,पोलिसांनी पथसंचलन केले.यात 2 अधिकारी व 20 अंमलदार तसेच बीएसएफ चे 2 अधिकारी व 38 जवान आणि आरसीपीचे 25 कर्मचारी सहभागी झाले होते. पथ संचलनास लिंबागणेश पोलिस चौकी येथुन सुरूवात होऊन बसस्थानक,, हनुमान चौक,वाणी चौक, ढवळे चौक, सरकारवाडा यामार्गे शेवटी पोलिस चौकी येथे सांगता झाली.

ताज्या बातम्या