बीड : विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवारी संदीप क्षीरसागर यांना जाहींर झाली आहे.. शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये बीडच्या उमेदवारीवरुन मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु होती. या पार्श्वभूमीवर आज उमेदवारांची दुसरी यादी पक्षाने जाहीर केली आहे. यात बीडमधून पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी मधील फुटीच्या वेळी बीड जिल्ह्यातील संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवारांसोबत ठामपणे राहिले होते. त्यांच्या या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे.