spot_img
22.2 C
New York
Monday, June 22, 2026

Buy now

spot_img

संंत ज्ञानेश्‍वरनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा नागरिकांवर हल्ला

बीड : शहरातील संत ज्ञानेश्‍वरनगर भागातील दक्षिण हनुमान मुखी परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून गेल्या तीन ते चार दिवसात चार ते पाच लोकांचा चावा घेतला आहे. त्यामुळे नगर परिषदेने तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून केली जात आहे.
बीड शडरातील भक्तीकन्स्ट्रक्शन परिसरात असलेल्या संत ज्ञानेश्‍वर नगर परिसर हा रहदारीचा परिसर आहे. या ठिकाणी दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून रस्त्याने चालणारे लोक बेसावध असतात. दबा धरून बसलेले कुत्रे अचानक हल्ला करतात. आतापर्यंत चार ते पाच लोकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा नगर परिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या