spot_img
20.3 C
New York
Thursday, June 25, 2026

Buy now

spot_img

अशोक माध्यमिक विद्यालयाचा हर्षद गव्हाणे शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण

शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार
वडवणी : तालुक्यातील चिंचाळा येथील अशोक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी हर्षद श्रीकांत गव्हाणे याने सन २०२३-२४ यावर्षी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) च्या धर्तीवर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र झाला आहे.
या मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे अशोक माध्यमिक विद्यालय चिंचाळा, या शाळेचे संस्थापक सचिव प्रा.सर्जेराव काळे सर व मुख्याध्यापक सावंत सर यांनी हर्षद गव्हाणे याचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

ताज्या बातम्या