spot_img
8.8 C
New York
Monday, March 24, 2025

Buy now

spot_img

केंद्र सरकारकडून नवीन पेन्शनची घोषणा;दहा वर्षात नोकरी सोडली तर दहा हजार

नवी दिल्ली : सरकारी कर्मचार्‍यांसाठी केंद्र सरकारने मोठी निर्णय घेतला असून नवीन पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे नाव यूनिफाइड पेन्शन स्कीम असणार आहे. जर एखाद्या कर्मचार्‍याने किमान २५ वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या किमान ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून त्या कर्मचार्‍यास मिळेल. जर पेन्शनधारकाचे निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला मृत्युसमयी मिळणार्‍या पेन्शनच्या ६० टक्के रक्कम मिळेल, अशी तरतूद या नव्या पेन्शन योजनेत करण्यात आली आहे. समजा, नोकरदाराने १० वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली, तर त्याला १० हजार रुपये पेन्शन मिळेल, अशी तरदूत या यनिफाइड पेन्शन स्कीममध्ये करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचार्‍यांकडून सातत्याने पेन्शन योजनेत सुधारणा करण्याची मागणी होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेसाठी डॉ. सोमनाथ कमिटी गठीत केली होती. या समितीने पेन्शनसंदर्भात विस्तीर्ण चर्चेनंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या अभ्यासानंतर केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत पेन्शन योजेसंदर्भात मोठा निर्णय घेतला. युनिफाइड पेन्शन योजनेस मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नोकरीतील निवृत्तीनंतर मिळणार्‍या पेन्शनच्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या