spot_img
19.3 C
New York
Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धाड

1 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल 
केज : ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणार्‍या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई मध्ये 1 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक व मॅनेजरयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी एका गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की,केज-बीड या राष्ट्रीय महामार्गावरील मस्साजोग येथील अभिषेक बिअरबार येथे दि.15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने ड्रायडे असताना देखील सदरचे बियर बार उघडे ठेवून दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने दुपारी 3-00 वाजण्याच्या सुमारास केज पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता त्या ठिकाणी दारू विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यावरून सदर पथकाने छापा टाकून दोन पंचा समक्ष पंचनामा करून विदेशी दारू, रम,व्हिस्की,बियर,व्होडका इत्यादी असा अंदाजे एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील रा.मस्साजोग आणि मालका विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ बीड,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम आंबेजोगाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना उप विभागीय अधिकारी केज,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस ठाणे केज यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी, पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे,चालक पोलीस हवालदार शंभूदेव दराडे,पोलीस काँन्स्टेबल प्रकाश मुंडे,गोपीनीय शाखेचे पोलीस काँन्स्टेबल मतीन शेख यांनी सदर कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या