१ ऑगस्टपर्यंत २७,०५,२१० कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा नोंदी प्रशासनाने तपासल्या
बीड : कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी – मराठा यांच्या १ ऑगस्ट २०२४ पर्यंत बीड जिल्हा प्रशासनाकडून एकूण २७,०५,२१० नोंद तपासण्यात आलेल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने २४ ऑक्टोबर २०२३ पासून १ ऑगस्टपर्यंत एकूण २७,०५,२१०, नोंदी तपासण्यात आल्या. जिल्हयामध्ये २१,९०७ आतापर्यंत एकूण कुणबी नोंदी सापडल्या. जिल्हयात ५२१ गांवामध्ये कुणबी नोंदी सापडल्या. त्यापैकी ४६७ गांवाची संख्या प्रसद्धि करण्यात आलेली आहे.
बीड तालुक्याची कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा बाबतच्या नोंदी खालील प्रमाणे बीड तालुक्यात तपासलेल्या नोंदींची एकूण संख्या ३,९२,२१७, एकुण कुणबी नोंदींची संख्या ३०६१, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या ९८, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या ९८ इतकी आहे.
गेवराई तालुक्यात तपासलेल्या नोंदींची संख्या ३,२८,०१४, एकुण कुणबी नोंदींची संख्या ४३७५, कुणबी नोंद सापडल्या गावांची संख्या १२२, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या १२२ इतकी आहे. शिरूर-कासार तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या १,१७,६२९ एकुण कुणबी नोंदींची संख्या ३५२ कुणबी नोंद सापडल्या गावांची संख्या १५, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या १४ इतकी आहे.
पाटोदा तालुक्यात तपासलेल्या नोंदींची संख्या १,३४,६५१ एकुण कुणबी नोंदींची संख्या ९०६, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या २२, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या २२ इतकी आहे. आष्टी तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या २,९९,१०६, कुणबी नोंदींची संख्या ५१९९, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या ६०, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या ३२ येवढी आहे.
माजलगाव तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या ४,००,२१३, एकूण कुणबी नोंदीची संख्या २२००, कुणबी नोंद सापडलेला गावांची संख्या ५१, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या ५६ इतकी आहे. धारूर तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या १,८८,३७४, एकुण कुणबी नोंदींची संख्या ८१७, कुणबी नोंद सापडलेला गावाची संख्या २३, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या १० इतकी आहे.
वडवणी तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या ७८,२५५ एकूण कुणबी नोंदींची संख्या १०३२, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या ३१, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या १८ इतकी आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या १,०१,३९०, एकूण कुणबी नोंदींची संख्या ७१६, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या २६, त्यापैकी यादी प्रसिद्ध केल्या गावांची संख्या २५ इतकी आहे.
केज तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या ३,५०,०७८ एकूण कुणबी नोंदींची संख्या २६३०, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या ५५, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या ५४ इतकी आहे.
परळी तालुक्यातील तपासलेल्या नोंदींची संख्या ३,१५,२८३, एकूण कुणबी नोंदींची संख्या ६१९, कुणबी नोंद सापडलेल्या गावांची संख्या १८, त्यापैकी यादी प्रसिद्ध केलेल्या गावांची संख्या १६ केलेली आहे.
२४ ऑक्टोबर २०२३ पासून कुणबी, कुणबी-मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांच्या तपशीलानुसार १०,६,३३६ जात प्रमाणपत्रांची अर्जांची संख्या असून आतपर्यंत ९८१७३ नागरीकांना जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत. ५७ नामंजूर अर्ज असून ८१०६ इतके प्रलंबित अर्ज आहेत. प्रलंबित अर्जांपैकी ४३८१ अर्ज त्रुटीमध्ये आहेत. प्रलंबित व त्रुटी अर्जांवर कार्यवाही करण्याची दक्षात घेण्यात येत आहे. यासंदर्भातील तालुका निहाय माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
बीड तालुक्यात जात प्रमाणपत्र अर्ज संख्या २२,३८९ असून निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या १८,७८६, नामंजूर अर्ज संख्या एकही नाही, प्रलंबित अर्जाची संख्या ३६०३ इतकी आहे.
गेवराई तालुक्यात जात प्रमाणपत्र अर्ज संख्या १८,५७०, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या १६,०५९, नामंजूर संख्या एकही नाही, प्रलंबित अर्जाची संख्या २५११ इतकी आहे.
शिरूर कासार तालुक्यात जात प्रमाणपत्र अर्ज संख्या ६०५६, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या ५३५९, नामंजुर अर्ज संख्या एकही नाही. प्रलंबित अर्जाची संख्या ६९७ इतकी आहे.
पाटोदा तालुक्यात जात प्रमाणपत्र संख्या १०,४५७, निर्गमित जात प्रमाणपत्र संख्या १०,२६६, नामंजूर अर्ज संख्या २७, प्रलंबित अर्जाची संख्या १६४ इतकी आहे.आष्टी तालुक्यात जात प्रमाणपत्र अर्ज संख्या १४,९४४, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या १४,८३१, नामंजुर अर्ज संख्या २०, प्रलंबित अर्जाची संख्या ९३ इतकी आहे.
माजलगाव तालुक्यातील जात प्रमाणपत्र संख्या ६३६०, निर्गमित जात प्रमाणपत्र संख्या ६०६८, नामंजुर अर्ज संख्या २, प्रलंबित अर्ज संख्या २९० इतकी आहे.
धारूर तालुक्यातील जात प्रमाणपत्र संख्या ४२११, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या ३९६६, नामंजूर अर्ज संख्या एकही नाही, प्रलंबित अर्जाची संख्या २४५ इतकी आहे.
वडवणी तालुक्यातील जात प्रमाणपत्र अर्ज संख्या ४१७०, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या ३९२५, नामंजूर अर्ज संख्या एकही नाही प्रलंबित अर्ज संख्या २४५ इतकी आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील जात प्रमाणपत्र अर्ज संख्या ५८४०, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या ५७६९, नामंजुर संख्या एकही नाही, प्रलंबित अर्जाची संख्या ७१ इतकी आहे.
केज तालुक्यातील जात प्रमाणपत्र संख्या १२५७०, निर्गमीत जात प्रमाणपत्र संख्या १२,४८६, नामंजूर अर्ज संख्या एकही नाही, प्रलंबित अर्ज संख्या १०३ इतकी आहे.
परळी तालुक्यातील जात प्रमाणपत्र संख्या ७६९, निर्गमित जात प्रमाणपत्र संख्या ६५८, नामंजूर अर्ज संख्या ८, प्रलंबित अर्ज संख्या १०३ इतकी आहे.