spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

एटीएम बदलून फसवणुक करणारा धारूरमध्ये पकडला

न्यायालयाने दिली दोन दिवसाची पोलीस कोठडी
किल्लेधारूर  :  येथे ए टि एम वर ए टि एम बदलून घागरवडा येथील नागरीकाची फसवणुक करणारा आरोपी धारूर पोलीसानी मुद्देमाला सह पकडला न्यायालयाने दिली दोन दिवसाची पोलीस कोठडीदिली आहे धारूर पोलीसानी सि सि टि फुटे च्या अधारे वेगाने तपास करून हा आरोपी ताब्यात घेतल्याने पोलीसाचे या कारवाईचे सर्वञ कौतूक होत आहे
पोलीस स्टेशन किल्लेधारूर येथे फिर्यादी नामे बाबासाहेब गिण्यानदेव नाईकवाडे वय ५० वर्षे राहणार घागरवाडा तालुका धारूर हे पैसे काढण्यासाठी एसबीआय बँक शाखा धारूर येथील एटीएम मशीनवर मध्ये गेले असता अज्ञात आरोपीने एटीएम मधून पैसे काढून देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करून एटीएम कार्ड ची अदलाबदल करून ६१,०००/- रुपये परस्पर काढून फसवणूक केल्यामुळे अज्ञात आरोपी विरुद्ध पोस्ट धारूर येथे गुन्हा क्रमांक २०८/२०२४ कलम ३१६ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात गुन्ह्याचे घटना ठिकाणी एसबीआय बँक शाखा धारूर येथील सीसीटीव्ही फुटेज मिळून आल्याने केवळ सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीचा शोध धारूर आडस अंबाजोगाई मुडेगाव येथे जाऊन घेतला आसता आरोपी नामे विकास सतीश करंजकर वय २७ वर्ष राहणार मुडेगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड हा निष्पन्न झाला. सदर आरोपी शोधार्थ पथक रवाना करण्यात आले. तो आज रोजी अंबाजोगाई येथे मिळून आल्याने आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून तपास करण्यात आला. त्याने गुन्हा कबूल केला असून त्याने गुन्ह्यात एटीएम कार्ड चा वापर करून काढलेले ६१,०००/- रुपये व गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आलेली आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे चार दिवसात गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस धारूर कोर्टात हजर केले असता माननीय कोर्टाने आरोपीची दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. आरोपीने आणखी काही ठिकाणी केलेले गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याबाबत तपास चालू आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके , सहाय्यक पोलीस अधीक्षक . कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे पोलीस हवालदार रमाकांत भुसारी, चांदणे, पोलीस अंमलदार नाना निंगुळे यांनी केली आहे.पोलीसाचे या कारवाईचे सर्वञ कौतूक होत आहे

ताज्या बातम्या